कॉम्प्युटर तुम्हाला देत असलेले ‘हे’ आजार माहीत आहेत का?

 कॉम्प्युटर तुम्हाला देत असलेले ‘हे’ आजार माहीत आहेत का?

----




वाढत्या टेक्नॉलॉजीच्या या विश्वात लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर शिवाय काम करण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. आपल्या दैनंदिन कामांसोबतच व्यक्तीचं भविष्य आणि नोकरीही कॉम्प्युटर वर आधारित आहे. अशात कॉम्प्युटर वापर अधिक होणे स्वाभाविक आहे. पण कॉम्प्युटर अधिक वापराने व्यक्तीला वेगवेगळे आजाराही तितक्या वेगाने आपल्या जाळ्यात घेत आहेत. झालं असं आहे की, लोकांना याची सवयही लागली आहे. कामा व्यतिरिक्तही अनेक लोक कम्प्युटर आणि लॅपटॉपवर मनोरंजनासाठी अधिक वेळ देत आहेत. अशात त्यांना त्यांची ही सवय मोडणेही कठीण झा

👉 >> डोकेदुखी

कम्प्युटर आणि लॅपटॉपसारखे इलेक्ट्रॉनिक उपकरण डोकेदुखीचं आणि मायग्रेनचं मोठं कारण ठरतात. त्यामुळे जर तुम्ही खूप जास्त वेळ कम्प्युटरवर काम करत असाल तर तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या होऊ शकते. असे मानले जाते की, कम्प्युटरच्या स्क्रीनचा प्रकाश, पॅटर्न आणि चित्रांमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर सर्वात जास्त वाईट प्रभाव पडतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना डोकेदुखीची समस्या होते.

👉 >> मांसपेशींमध्ये समस्या

एका रिसर्चमध्ये असं आढळलं आहे की, फार जास्त वेळ खुर्चीवर बसून कम्प्युटर काम करत राहिल्याने मांसपेशी थकतात. त्यामुळे मांसपेशींमध्ये वेदना होण्याची समस्या उत्पन्न होते. त्यासोबतच पाय, छाती, खांदे आणि हात सुन्न होतात. कम्प्युटरवर अनेक तास सतत बसून राहिल्याने हे एक मोठं नुकसान होतं.

👉 >> डोळ्यांसाठी घातक

कम्प्युटरवर काम करतेवेळी सतत स्क्रीनकडे बघत राहणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे. अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासात असं आढळलं की, फार जास्त वेळ स्क्रीनसमोर बसल्याने डोळ्यांना थकवा, खाज, डोळ्यातून पाणी येणे आणि डोळ्यांना जड वाटणे या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी अकाली कमजोर होते. खासकरुन लहान मुलांच्या डोळ्यांवर याचा फार वाईट प्रभाव पडतो.




Comments