यशवंत रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना उपलब्ध , माजलगाव

 आता माजलगावातही होणार मोफत उपचार 

यशवंत रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना उपलब्ध

-----------------------



 राज्य शासन सर्वसामान्य रुग्णांची काळजी घेत विविध योजना रावबित असून यामुळे दुर्धर आजारावर रुग्णांना याचा मोठा फायदा होत आहे. हे मोफत उपचार माजलगावसारख्या ग्रामीण भागातील यशवंत हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार होणार आहेत. शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना या हॉस्पिटलमध्ये मंजूर झाली असल्याने कोणत्याही रेशन कार्डावर सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळणार आहेत.

राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना  माफक व मोफत दारात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन विविध योजना अमलात आणत आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक मशनरीसह नागरिकांच्या आरोग्यासाठी उपक्रम राबवीत आहे. यातील एक भाग म्हणून राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना अमलात आणली आहे. या योजनेतून उपचार घेण्यासाठी ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते; परंतु हि योजना माजलगाव शहरातील प्रसिध्द यशवंत रुग्णालयात मंजूर झाली आहे. नागरिकांकडे असलेल्या कोणत्याही रेशन कार्डावर अनेक आजाराचा उपचार होणार असून तोही मोफत होणार आहे. यामुळे माजलगाव तालुक्यातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार असून या योजनेतून उपचार घेण्यासाठी आता बाहेरगावी जाण्याची गरज पडणार नाही.

--------------------

या आजारावर होणार मोफत उपचार 

---------------------

दुर्बीणद्वारे संध्याच्या, हाडाच्या शस्त्रक्रिया, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार, अँन्जोप्लास्टी, मुतखडा, प्रोस्टेटची शस्त्रक्रिया, कर्करोगावर केमोथेरपी व शस्त्रक्रिया, सिझेरियन व गर्भपिशवीची शस्त्रक्रिया, मेंदूज्वर, अर्धांगवायू, मेंदूविकार व शस्त्रक्रिया, विषबाधा, रस्ते अपघातातील शस्त्रक्रिया आदी आजारावरील उपचार व शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत.

----------------------

यशवंत रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना मंजूर झाली असून आता ग्रामीण भागातील रुग्णांना यासाठी बाहेरगावी जाण्याची आवश्यकता पडणार नाही. रुग्णांनी आजाराबाबतच्या आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता केल्यास मोफत उपचार केले जाणार आहेत.

डॉ. युवराज कोल्हे, यशवंत हॉस्पिटल, माजलगाव.

Comments